मालवण :
आचरा पिरावाडी येथील युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरात पोहोचले व नाट्यकर्मी परिचित असलेले श्री. पराग नामदेव कुबल यांच्या मातोश्री श्रीमती शुभांगी नामदेव कुबल यांचे दि. २१ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यावेळी त्या ७० वर्षांच्या होत्या. देवगड आनंदवाडी येथील पूर्वाश्रमीच्या हेमा उमाजी धुरी यांनी आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी सर्वांना आपलेसे केले होते.त्यामुळे त्या हेमा मावशी म्हणून सर्वत्र ओळखल्या जात होत्या. त्यांनी आचरा पिरावाडी पंचक्रोशीत सार्वजनिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेत होत्या. तसेच त्या परोपकारी वृत्तीने सहकार्य करीत असायच्या,त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता. त्यांच्या पश्चात विवाहित पराग, जयदीप, दत्तदर्शन असे तीन मुलगे आणि एक मुलगी सोनाली कोचरेकर, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने देवगड व मालवण येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर पिरावाडी येथील हिंदू स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
