*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ओळख बारा महिन्यांची*
चैत्र महिना बहराचा,
आंबे मोहोर फुलण्याचा…..
वैशाखात रणरण ऊन ,
आग ओके चहुकडून …..
जेष्ठांतील मंगळागौर
सावित्रीची महती थोर…..
आषाढाची वारी पंढरी
स्नान चांद्रभागे तीरी…..
श्रावणात सरसर सरी
इंद्र धनुष्य केंव्हा तरी…..
भाद्रपदात आगमन गणेशाचे
श्राद्ध घालू पितृपक्षाचे…..
आश्विन मास नवरात्रीचा
गरबा टिपऱ्या गमतीचा…..
कार्तिक मासी दिवाळी
आतिषबाजी आभाळी…..
मार्गशीर्षात दत्त आरती
महालक्ष्मीला मस्तक जुळती…..
पौष मासी सण आला
तिळगुळ घ्या नि मधुबोला…..
माघाची थंडी असते बोचरी
शेकोटी पेटवा दारोदारी….
फाल्गुन महिना होळी पूजन
धुळवाडीची उधळू उधळण….
बारा महिने अगणित सण
चला करू या त्यांची आठवण…..
*शीला पाटील .चांदवड.*
