You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा;

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

सिंधुदुर्गनगरी

व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची  तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होत आहे. हॉटेल व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सहारे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.हॉटेल चालकांनी संयम बाळगून काम करावे आणि नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज किंवा असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधण्यासाठी हॉटेल व व्यापारी संघटनांनी आपले प्रतिनिधी नियुक्त करावेत असेही पालकमंत्री म्हणाले.

०००००००

‘सिंधु आरोग्य मेळावा २०२६’ चे प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) :-  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत यावर्षी ‘सिंधु आरोग्य मेळावा 2026’ हा दि. 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा, ता. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या आरोग्य मेळाव्यात विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत तपासणी, सल्ला व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक तसेच हृदयरोग तज्ञांचा समावेश आहे. तसेच, सर्वसाधारण आरोग्य तपासणी (ब्लड प्रेशर, ब्लड शुगर), विविध रक्त तपासण्या (हिमोग्लोबिन, लिव्हर व किडनी फंक्शन) तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग (मुख, स्तन, गर्भाशय मुख) यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरादरम्यान आयुष्यमान कार्ड व वंदना कार्ड देखील काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणारआहे. याकरिता नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी येताना सोबत अद्ययावत रेशन कार्ड ,आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर घेऊन येण्याचा आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून मा. श्री. प्रमोदजी कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपस्थित राहणार आहेत. तसेच या आरोग्य मेळाव्याला  प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, पंचायत समिती सावंतवाडी,  सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गट विकास अधिकारी सावंतवाडी वासुदेव नाईक, तालुका आरोग्य अधिकारी, सावंतवाडी डॉ. रमेश कर्तस्कर, हे उपस्थित राहणार आहेत.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा व आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा