You are currently viewing कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, रसिका तेडोलकर प्रथम

कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न, रसिका तेडोलकर प्रथम

मालवण :

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक आयोजित कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. परीक्षकांचे निर्णयानुसार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.

*प्रथम* = सौ.रसिका राजेंद्र तेडोलकर, कसाल, कुडाळ *द्वितीय* = श्री . हेमंत मोतीराम पाटकर, कणकवली *तृतीय* = सौ.उज्वला चंद्रशेखर धानजी, कणकवली तर *उत्तेजनार्थ* = श्रीम. श्रेया उमेश कुलकर्णी, ओरोस, कुडाळ.

विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम रु. 2000, द्वितीय रु. 1500, तृतीय रु.1000 आणि उत्तेजनार्थ रु 500 अशा रोख स्वरूपाच्या रक्कमां सहित सन्मान चिन्हे आणि प्रमाणपत्र पारितोषिक म्हणुन मान्यवरांचे हस्ते देण्यात आली. तर सहभाग उत्तेजनार्थ म्हणुन सर्वश्री श्री. योगेश रविंद्र मुणगेकर, आचरा, मालवण श्री. सुधाकर महादेव वळंजू, पणदूर, कुडाळ, श्री. काशीराम बाळकृष्ण अपराज, चिंदर, मालवण यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. सुरेश शामराव ठाकूर, (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण) हे होते. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्रीम . ऋजुता केळकर मॅडम ग्रंथपाल बॅ.नाथ पै वाचनालय मालवण यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीम. मधुरा माणगावकर कणकवली आणि श्रीम. ऋतुजा केळकर मालवण यांनी काम पाहिले. उद्धाटन सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. सुरेंद्र सिताराम सकपाळ अध्यक्ष कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक यांनी केले. प्रास्ताविकामध्ये बोलतांना स्पर्धेची रूपरेषा सांगुन या स्पर्धेचे उद्घाटक हे जिल्ह्यातील कोणत्याही वाचनालयाचे ग्रंथपाल असतात म्हणजे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना हा मान प्रतिवर्षी दिला जातो ही या स्पर्धेची विशेष बाब आहे.शेवटी स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना धन्यवाद दिले.

पारितोषिक वितरण सोहळा श्री. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी श्री.चंद्रशेखर धानजी सर, श्री. अरविंद कदम सर, श्री.रमाकांत शेटये सर श्री.एकनाथ गायकवाड सर, दोन्ही परीक्षक श्रीम. माणगावकर मॅडम व श्रीम. केळकर मॅडम इ.उपस्थित होते. अध्यक्ष पदावरून बोलतांना श्री. सुरेश ठाकूर गुरुजी यांनी स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या या वक्तृत्व स्पर्धेचे संयोजन आणि नियोजन प्रतिवर्षी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मार्गदर्शक असे करण्यात येत असते.

सर्व स्पर्धक उत्तमच होते सादरीकरणही उत्तम केले पण आणि उत्तम प्रकारे स्पर्धेत सादरीकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच दोन्ही परीक्षकांनी परीक्षणं उत्तम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व अशी स्पर्धा प्रतिवर्षी होणार असल्याचेही जाहीर केले.

कार्यक्रमासाठी ग्रंथपाल श्री. विवेक उर्फ बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल श्रीम. चैताली सुतार, लिपिक श्रीम. चैताली गोसावी, व ग्रंथालयीनी कर्मचारी श्रीम. समिधा जाधव यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एकनाथ गायकवाड सर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा