*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अस्तित्व*
〰️〰️〰️
वाटते यावेस साक्षात तू पुन्हा एकदा
आजही राऊळी ती रुणझुणती गोपुरे
तुझे रुपडे लाघवी मिटलेले या लोचनी
सांगना काय काय कसे विसरावे सारे
आठवांच्या खुणा साऱ्याच सभोवती
स्मरते आजही मर्मबंधातले गूढ सारे
जीवात्मा हाच बेचैन तुझ्यात गुंतलेला
आत्मरंगात प्रतिबिंब तुझेच सावरणारे
व्योमातही या भारलेले अस्तित्व तुझे
सांगना क्षणक्षण ते कसे विसरावे सारे
दिसे जरी सामोरी क्षितिज सांजाळलेले
चक्षुत तुझे स्पर्शभास लिलया रेंगाळणारे
शब्दातली अव्यक्त ही व्याकुळ स्पंदने
गुंतता भावगीतात रुणझुणती ती गोपुरे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*©️वि.ग.सातपुते (भावकवी )*
*📞( 9766544908 )*
