You are currently viewing स्वामी समर्थ
Oplus_16908288

स्वामी समर्थ

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्वामी समर्थ*

 

नाव स्वामी समर्थांचे

घेता सदा मुखावर

दुःख हरूनिया जाते

मनी सौख्याचा पाझर

 

होते तृतीय स्वरूप

दत्तगुरु महाराज

दिले पूर्णत्त्व कार्यास

सदा भक्तीचा आवाज

 

स्वामी अक्कलकोटचे

अशी ख्याती जगभर

कमी काळातच केली

दिव्य कृपा भक्तांवर

 

चराचर स्वामीमय

धैर्य अगाध राखले

दुःख भक्तांचे हरण्या

स्वामी प्रकट जाहले

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा