पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पक्षप्रवेश; स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
कणकवली :
देवगड तालुक्यातील पडेल जि.प. मतदार संघातील वाडा गावात भारतीय जनता पार्टीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत असून उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी कणकवली ग्राम मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पडेल मंडळ अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, पडेल सरपंच भुषण पोकळे, अविनाश सहस्त्रबुद्धे, आशिष जाधव यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
वाडा गावातील प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुहास वाडेकर, शशांक तावडे, स्नेहल मेस्त्री, सत्यवान मेस्त्री, रघुनाथ वाडेकर, राजेंद्र वाडेकर, निमेश परब, सतीश परब, सर्वेश परब, संतोष वाडेकर, सुशांत पंचाळ, संतोष मेस्त्री, हेमंत पांचाळ, शरद मेस्त्री, विजय पांचाळ यांचा समावेश आहे.
या सर्वांसह उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पक्षाला बळकटी दिली असून वाडा गावात भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होत आहे.
