You are currently viewing अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

आखाती देशातील तथा अमेरिका, इस्राइल व इराण या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज कंपनीमार्फत एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची आवक होत आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. त्यामुळे एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

गॅस सिलेंडरचे बुकिंग करताना OTP बुकिंग ऐवजी IOCL/BPCL/HPCL या कंपनीमार्फत दिलेल्या नवीन ऍपद्वारे बुकिंग करावे. बुकिंग केल्यानंतर तात्काळ गॅस सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. तसेच गॅस बुकिंगसाठी कंपनीने बदलेल्या प्रक्रियेनुसार शहरी भागात 25 दिवस व ग्रामीण भागात 45 दिवस गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाईल. याची नोंद घ्यावी  व कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये.

याबाबत काही अडचणी उ‌द्भवल्यास हेल्पलाईन क्र. 02362-228847 /1077, मोबाईल क्र. 7498067835 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा तात्काळ संबंधित तालुक्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा.

सर्व तालुक्यातील तक्रार निवासरणासाठी नियुक्त केलेले अधिकारी/ कर्मचारी  व त्यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र तालुका निरीक्षण अधिकारी मोबाईल क्र.  पुरवठा निरीक्षक मोबाईल क्र.
1 देवगड श्री. संग्राम गुट्टे 8010376746 श्री.सुनील बेबले 9222106318
2 कणकवली श्री. नितीन डाके 7020717934 श्री.रती घोडके 8793595506
3 वेंगुर्ला श्री. विजय पवार 9923693779 श्रीम. तृप्ती गडकर 7507910823
4 सावंतवाडी श्रीम. दिपाली वाघमारे 7798792616 श्री. कमलेश ठाकूर 9423587813
5 मालवण श्रीम. शीला निकस 8888113923 श्री. विशाल कापसे 8888269729
6 कुडाळ श्री. विजय पवार 9923693779 श्रीम. शिवानी पाटील 8390625676
7 वैभववाडी  श्रीम.सीमा गायकवाड 8329957225 श्री. रामेश्वर दांडगे 8830303509
8 दोडामार्ग श्री. संजय मद्रे(प्र.) 8983663466 श्री.कृष्णा वेंगुर्लेकर 9158326010

 

प्रतिक्रिया व्यक्त करा