जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना
————————————-
सत्य, विवेकी जीवनधारा
सोबत घेऊ विचार तोरण
उभारू गुढी नव्या युगाची
मिळून त्याचे व्हावे औक्षण
तंत्र नवे अन विज्ञान नवे
प्रगतीचे बघ खुलले अंगण
अंगिकारण्या ते ज्ञान नवे
खुल्या दिलाने कर तू औक्षण
रूढी रिती अन कुठल्या श्रद्धा
नका विसंबू जारण मारण
तर्क संगती घेउन साथी
विज्ञानाचे होते औक्षण
स्पर्धा, ईर्षा, सत्ताकांक्षा
नाशाला ते झाले कारण
त्यजून सारा गर्व मनाचा
नव्या जगाचे करतो औक्षण
दिशा उजळल्या प्रभात झाली
त्या तेजाला केले धारण
दार उघडले दिशा फाकल्या
नव सूर्याचे कर तू औक्षण
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
9130861304
19.03.2026
