एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मंगळवारी संध्याकाळी कुडाळ येथील मैदानावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यात एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी आमदार निलेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाभरातून भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
