You are currently viewing इकी गाई फार्म अँड प्रोडक्ट कंपनीच्या उद्घाटनासाठी नारायण राणेंना निमंत्रण

इकी गाई फार्म अँड प्रोडक्ट कंपनीच्या उद्घाटनासाठी नारायण राणेंना निमंत्रण

इकी गाई फार्म अँड प्रोडक्ट कंपनीच्या उद्घाटनासाठी नारायण राणेंना निमंत्रण

स्थानिक कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून निर्यातीचा संकल्प

सिंधुदुर्ग :

इकी गाई फार्म अँड प्रोडक्ट या कंपनीच्या वतीने प्रोप्रायटर मिसेस चैताली मनोज सावंत, मनोज सावंत आणि सुरेश सावंत यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची भेट घेऊन कंपनीच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिले.
मौजे नाटळ येथे सुरू होणाऱ्या या कंपनीत सिंधुदुर्गातील विविध कृषी व फळउत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांचे बाय-प्रॉडक्ट तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये काजू बोंड, करवंद, जांभूळ, आंबा, आवळा, रतांबा, शेवग्याचा पाला, हळद तसेच दूध, दही, चारा, बोरं आणि विविध पालेभाज्यांचा समावेश आहे.
या उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यांना बाजारपेठेत पुढे नेण्याबरोबरच निर्यात करण्याचा कंपनीचा मानस आहे. स्थानिक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कंपनीचे उद्घाटन माननीय नारायणराव राणे यांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती सावंत कुटुंबियांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा