सावंतवाडी (नवसरणी) येथे मित्रांमध्ये हाणामारी; एक जखमी, सामाजिक बांधिलकी टीमकडून तत्पर मदत
सावंतवाडी
सावंतवाडीतील नवसरणी येथे आज दुपारी सुमारे तीनच्या सुमारास दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेत आनंद भोसले (वय ४८, कोल्हापूर) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकी संस्थेचे रवी जाधव यांना दिली. माहिती मिळताच रवी जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी जखमी व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत होती. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी जखमीला स्वतःच्या मोटरसायकलवरून तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सध्या जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणात उदयसिंह गायकवाड (वय ३२, कोल्हापूर) याने मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या मदतकार्यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि पॅनर परेरा यांनी सहकार्य केले.
