महाराष्ट्राचे लोकप्रिय तरुण नेतृत्व निलेशजीं चा आज जन्मदिवस,,,,,,,,,,🎂💐
राज्यातील युवकांचे श्रद्धास्थान आणि सर्वसामान्यांच्या घरातील कार्यसम्राट “आमदार ” अशी प्रतिमा अल्पावधितच राज्यभर निर्माण झालेलं तरुण नेतृत्व म्हणजेच निलेशजी,,,,,,,,
2009 च्या संसदेतील सर्वात तरुण व कार्यसम्राट खासदार ते 2024 मधील सर्वात अभ्यासु आणि जनतेशी नाळ जुळलेला आमदार हा निलेशजी चा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे,,2014 ते 2024 हा दहा वर्षाचा निलेशजींचा काळ अत्यंत कसोटीचा व प्रतिकुल राजकीय परिस्थिती चा गेला, ह्या राजकीय विजनवासाच्या काळात कोणत्याही सत्तेच्या पदावर नसतानाही निरपेक्षपणे जनतेमध्ये राहुन, जनतेत समरस होऊन,जनसेवेचे व्रत अखंडपणे चालु ठेवले,,,,,अनेक राजकीय अडथळे पार करत, संघर्ष करत, आदरणीय राणे साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तयार झालेलं हे खंबीर,, अभ्यासु,, आक्रमक,, तेव्हढेच हळवे नेतृत्व आहे !!!!!
म्हणुनच,,,,, तो आला,,,, त्यांनी पाहिले,,,, आणि तो जिंकला,,,,,!!!!!! ह्या उक्ती प्रमाणे व जनतेच्या अभूतपूर्व पाठिंब्याने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विधानसभा निवडणूक एकहाती जिंकुन आमदार म्हणुन राज्याच्या राजकारणात दिमाखदार प्रवेश केला,,,,,!!!!! उच्चविद्याविविभूषित,, रुबाबदार राजबिंडे व्यक्तिमत्व,,अभ्यासूपणा,, भाषेवरील प्रभूत्व,,प्रत्येक विषयांचे सखोल ज्ञान,, आणि आक्रमक व आकर्षक देहबोली,, अशा ह्या सर्व नैसर्गिक गुणांमुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील हा “तारा” सगळ्या राज्याचे किंबहुना देशाचे लक्ष वेधून घेत असतो,,,,,,!!
नोव्हेंबर 2024 मध्ये निलेशजी आमदार झाले आणि ताबडतोब डिसेंबर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरु झाले पहिल्याच अधिवेशनापासुन निलेशजी नी सभागृहावर आपली हुकूमत निर्माण केली, महाराष्ट्रातील व कोकणातील प्रत्येक विषयाला वाचा फोडण्याचे काम निलेशजी सातत्याने करत आहेत,,, मुद्देसूदपणा,, अभ्यासूपणा ,, विषयांचे गांभीर्य ,, अशाप्रकारे जनहिताच्या प्रत्येक प्रश्नावर सरकार ला धारेवर धरून संबधीत प्रश्न मार्गी लावण्याचे एकहाती काम निलेशजी सभागृहात करत असतात,,,,निलेशजी नी आतापर्यंत च्या प्रत्येक अधिवेशनात ज्या ज्या विषयांना हात घातला तो प्रत्येक विषय कोकणी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असुन जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत,,, उदा : आकारिपड, वनसंज्ञा,, कबूलतदार,, हे प्रश्न आजपर्यंत कोणत्याही सदस्यांनी आकडेवारी सह सभागृहात मांडले नव्हते ,,, पण निलेशजी च्या अभ्यासूपणा ची आणि कोकणी बाण्याची चुणूक अख्या सभागृहाने व महाराष्ट्रातल्या जनतेनी पाहिली, आणि त्यावर सरकारला आपले म्हणणे मांडावे लागले,,,, हि धमक लोकप्रतिनिधी मध्ये असावी लागते,, आणि आज आदरणीय राणे साहेबांचे वारसदार म्हणुन ना, नितेशजी आणि आ,निलेशजी महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर चमकत आहेत,,,,,मी गेली अनेकवर्षे प्रेक्षक ग्यालरीत बसुन अनेक जेष्ठ दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकलीत, आणि आपला युवानेता त्या दिग्गज नेत्यांच्या पंगतीत आहे हे बघुन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा ऊर भरून येतो, असे वाटते की निलेशजीची हि पहिलीच टर्म नसून अनेक वर्ष ह्या सभागृहाचे सदस्य असल्या सारखा कामकाजतील सहभाग असतो,,,,,!!”
अनेकदा अधिवेशनात दोन्ही सभागृहात धोरणत्मक बाबींवर फार कमी सदस्य बोलतात,,अर्थसंकल्प म्हणजे किचकट व क्लिष्ट विषय,,मात्र निलेशजी चे भाषण इतकं सुस्पष्ट, अभ्यासपूर्ण आणि राज्यसरकार ला विचार करायला लावणार होतं,सध्यस्थितीत विरोधी पक्ष क्षीण अवस्थेत असल्यामुळे सत्ताधारी असुनही सरकार चे जनतेच्या समस्यावर लक्ष वेधण्याचे काम निलेशजी चं करत असतात,,,,,,!!!खरच त्याला तोड नाहीं,,, आमदाराकडून मतदारांच्या याच अपेक्षा असतात, निलेशजींनी हि कसर भरून काढली,, सामान्य माणसाला जे बोलता येतं नाहीं तोच सामान्य माणसाचा आवाज बनून निलेशजी सभासगृहात बोलत असतात,,, अशा ह्या कर्तृत्वान युवा नेत्याचा आम्हाला अभिमान आहे,,,,, संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या निलेशजी बद्दल लिहिण्यासाठी मराठी शब्दकोशात शब्द नाहीत एवढं कर्तृत्व ह्या युवानेत्याने सिद्ध केलंय,,,,,, अशा ह्या निर्मळ मनाच्या दिलदार नेत्याच्या पाठीशी परमेश्वरा चे आशीर्वाद आणि सामान्य जनतेच्या सदिच्छा नक्कीच आहेत,,,,,,, तरी आजच्या शुभदिनी निलेशजी च्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो व त्यांना गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती देवो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
शुभेच्छुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय
सावंतवाडी,
सिंधुदुर्ग,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
