You are currently viewing आठवणींचे मोरपीस…!

आठवणींचे मोरपीस…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आठवणींचे मोरपीस…!*

 

आठवणींचे मोरपीस

श्वासांच्या लयीत हसले

नाव कोरले

सख्याचे…

 

आठवणींचे मोरपीस

विरहाचे गीत गाते

सूर होते

विराणीचे…

 

कधी सुखावत

एकांतात मनाला भिजवते

चांदण्यांचेही होते

प्रेमगीत…

 

अलगद आणि

अलवार मनात शिरते

स्मरणांच्या घेते

नोंदी…

 

नि:शब्द रात्रींतून

पुन्हा पडसाद त्याचे

गोड आठवांचे

ठसे…

 

मनाला देते

सुखद आठवांची झुळूक

शमवते भूक

भावनेची…

 

आठवणींचे मोरपीस

मनाला उल्हसित करते

चैतन्याने भारते

क्षणिक…

 

सौ.प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा