*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
माय माऊली
तुझी साऊली
विश्वी नसे ग
अशी सावली
1
आधार तुझा
विश्वास माझा
सहवास हा
आनंद माझा
2
सन्कटे किती
बिकट येती
तूच असशी
गे हृदयाती
3
गोन्धळ चाले
सार्या जगती
तूच असता
मला न क्षिती
4
उन्हाची झळ
आईच्या माथी
गायवासरु
वात्सल्यसाथी
5
🐄🐄🐄🐄
स्वप्नगन्धा सतीश
