*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*टरफलं … झालीत आमची!*
टरफलं ….झालीत आमची
गरजेपूर्तीच आम्हांला किंमत राहिली
आता घालमेल फक्त चोथा होण्याची
कचराकुंडीत फेकून द्यायची वेळ आली
सुखासुखी आकांत टरफलांनाही
खरतरं… पूर्वीच मांडायचा होता
स्वतःच मोल ओळखण्या इतका
आशयाचा दाणा गिळता आला असता
फेकून टाकलेल्या टरफलांना
तसं स्वामित्वं.. कुणाचचं नसतं
आम्ही ती फेकलीच नाही सांगत
सा-यांना टिळक व्हायचं असतं!!
पायांत रूतण्याची टरफलांत
औकात कुवत कधीच नसते
चेंगरून दबक्या आवाजात मातीत
निपचित पडून राहावे लागते!!
कोण छोटा!कोण मोठा !
त्याचं मातीला काहीही घेणंदेणं नसते
निगृण,निर्मोही,निराकारी …
टरफलांना माती ओळखत असते!!
मातीचं टरफलांची ओळख ठेवते!!
बाबा ठाकूर
