*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझा… देव्हारा !*
अक्षरांची ओळख
शब्दांची सोयरीक
आसावरीची आस
श्रवणांची आरास
हाच माझा देव्हारा
भावनांचे गमक
मनजुळवे यमक
मात्रांची सप्तपदी
अर्थाची द्विपदी
हाच माझा देव्हारा
विषादहर्ता निषाद
माझा आशावाद
देहाचे ध्यान
देव्हा-याला दान
हाच माझा देव्हारा
विश्वाचे आर्त
मनी प्रकाशले
प्रसवशील उजेडाने
जगणं उजळले
हाच माझा देव्हारा
संचिताची मुळं
पैलपार… पसरली
तडफड शब्दांची
गाभा-यात ..शिरली
हाच देव्हारा..माझा
बाबा ठाकूर
