You are currently viewing पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघटन मंडलात निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग होणार.

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघटन मंडलात निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग होणार.

*पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघटन मंडलात निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग होणार.*

*प्रभाकर सावंत , जिल्हाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग.*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान कार्यशाळा संपन्न* —

*प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा संयोजक – सिंधुदुर्ग.*

ओरोस

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान 2026 ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यशाळा वसंत स्मृती ओरोस येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष माननीय प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांनी या महाप्रशिक्षण अभियानाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती समजावून सांगताना ” व्यक्ती निर्माणातुन संघटन निर्माण, संघटन निर्माणातुन राष्ट्र निर्माण ” हे प्रशिक्षणाचे उद्धीष्ट असल्याचे सांगितले .
या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातुन 30 अनुभवी वक्त्यांची नेमणूक करण्यात आली . तसेच त्यांची मुंबई येथे ” वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा ” घेण्यात आली . प्रत्येक मंडलांमध्ये निवासी कार्यशाळा संपन्न होतील . तसेच कार्यशाळेत सात सत्राच्या माध्यमातुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल .
या कार्यशाळेत वैचारिक अधिष्ठान , इतिहास आणी विकास , कार्यविस्ताराची आमची दृष्टी , कार्यपद्धती ( कार्यकर्ता सांभाळणे ) , आपल्या सरकारची कामगीरी आणि अंमलबजावणी ,बुथ व्यवस्थापन , सोशल मीडिया यासारख्या अनेक विषयावर मार्गदर्शन होईल. 30 मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण होतील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या कार्यशाळेंचा उद्देश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा असुन पक्ष बांधणीसाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील व मंडल स्तरावरील कार्यकर्तेंचे प्रशिक्षण होईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक प्रसन्न देसाई यांनी केली तर आभार प्रदर्शन जेष्ठ कार्यकर्ते राजू राऊळ यांनी केले. या कार्यशाळेत मंडल अध्यक्ष , मंडल संयोजन समीती व वक्ते यांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा