You are currently viewing सुंदरता…

सुंदरता…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुंदरता…*

 

किती सुंदर ते नयनमनोहर आहे

पाणीही झुळझुळू वाहे

ते माड पहा प्रतिबिंबाते बघती

बदके जलात विहरती..

 

ती कमलदले उमलून पानांवरती

सुप्रभात जणू ते म्हणती

गलबक्षी ती फुले कागदी हसती

जळात पाहूनी खुलती..

 

ते नीर कसे हिरवेपिवळे दिसते

साऱ्यांस पाहूनी खुश ते

ती नाव तिथे पांथस्थ कुणीही नाही

तीरावर वाट ती पाही..

 

हिरवाळीचे सुखद मनोहर चित्र

आभाळ जणू सन्मित्र

उतरली जळी निळी निळाई त्याची

वाढवी शोभा पाण्याची…

 

सारेच कसे मनमोहक सुंदर आहे

नजर ती खिळूनहो राहे

वाटते मना सफर कराया जावे

नावेत सुखे पहुडावे…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा