मोबाईलचा चुकीचा करता न करता, त्या मधील उत्तम गोष्टीने आपलं व्यक्तिमत्व घडवा. – प्रा. विजया मारोतकर.
नागपूर
मोबाईल फोन वापरणे आज काळाची गरज आहे. पण याचा अतिरेकी वापर झाला तर तो जीवन उध्वस्त करू शकतो. मोबाईल फोन वापरा पण जपून. मोबाईलचा चुकीचा करता न करता, त्या मधील उत्तम गोष्टीने आपलं व्यक्तिमत्व घडवा. असे मार्गदर्शन प्राध्यापक विजयाताई मारोतकर (नागपूर) यांनी केले. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणे व रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या *”पोरी जरा जपून*” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या कि, तरुणांना व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीकडे आपल्या जाळ्यात ओढण्याकरता अनेक अनैतिक यंत्रणा जाळे टाकून बसलेली असते. याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.आपल्या आई-वडिलांच्या अपार कष्टांची जाणीव सातत्याने मनात जागृत ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या. वाचन करा. वेगाने क्रांतीकडे जाऊ पाहणाऱ्या या जगात आपल्याला स्पर्धेमध्ये तर उतरायचे आहे त्याकरता मोबाईल ने इंटरनेट याचा वापरही करायचा आहे परंतु तो करत असताना आपण एखाद्या सायबर च्या जाळ्यात किंवा एखाद्या अनैतिक गुन्हामधे अडकणार नाही आणि आपले आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे तरुणाईला तळमळीचे आव्हान प्रा. विजयाताई मारोतकर यांनी केले.
सोमवार, दि. 9 मार्च रोजी हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहातप्रा पार पडला. यावेळी प्रा. विजया मारोतकर व चारुलता (सोनूू दीदी) पुरोहित त्यांना स्वयंसिद्धा या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. कामयानी सुर्वे, प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका सुरेखाताई कटारिया होत्या. त्याचबरोबर स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा सविता इंगळे, उपाध्यक्ष श्री नंदकुमार मुरडे, स्वयंसिद्धा पुरस्काराच्या मान्यवर पुरस्कारार्थी प्रा. विजयाताई मारोतकर व चारुलता (सोनू दिदी) पुरोहीत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले व इतर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित होते. महिला दिनाच्या निमित्ताने प्रा. विजया मारोतकर व चारुलता (सोनू दीदी) पुरोहीत यांना स्वयंसिद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या वतीने डॉ.रुपाली पोखरकर (Ph.D.in English) व डॉ.रेश्मा पवार (Ph.D.in Chemistry) तसेच मंदाकिनी सरोदे व
रोहित खैरनार या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महात्मा फुले महाविद्यालयातील कला विद्या शाखेच्या उपप्राचार्य डॉ.कामायनी सुर्वे म्हणाल्या,”पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून जगू देणे फार महत्त्वाचे आहे.
आज स्त्रीचे कर्तृत्व केवळ घरापुरते मर्यादित नसून शिक्षण, विज्ञान, अर्थव्यवस्था आणि समाजकार्यात ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिक स्वावलंबन, सहकार्य या भावनेतून आदिवासी व बहुजन समाजातील सर्व स्त्रियांची प्रगती साधणे, हीच खरी स्त्रीवादी दिशा आहे.”
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुरेखा कटारिया यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, “स्त्रीने स्वतःवर प्रेम करायला हवं. आपण इतरांसाठी कष्ट करतो. पण स्वतःलाही जपायला हवे, स्वतःची जिद्द सकारात्मक विचार ठेवून काम केले तर निश्चितच महिलांचे भविष्य उज्वल आहे.
स्वयंसिद्धाच्या पुरस्काराच्या दुसऱ्या पुरस्कारार्थी चारुलता (सोनू दीदी) पुरोहित आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, महिलांमध्ये, मुलींमध्ये जिद्द, चिकाटी असली असली पाहिजे, जर तुमच्याकडे जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर, कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करू शकता. आपण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर, आपल्या मिळकती मधील थोडासा वा आपण समाजासाठी खर्च करायला पाहिजे, समाजाचे ऋण फेडले पाहिजे. स्वयंसिद्धाच्या अध्यक्ष सविता इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविक मधे सांगितले की, “आज महिला दिनाच्या नावावर खूप साऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतात. महिला दिन हा फक्त सण उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर महिलांचा संघर्ष आठवून आणखी पुढे जाऊन महिलांना सक्षम करण्याचा हा दिवस आहे.
यावेळी पुरुषोत्तम सदाफुले, राज अहेरराव, सुरेश कंक, रजनी अहेरराव, शोभा जोशी राधाबाई वाघमारे, मल्लिकार्जुन इंगळे, दिलीप चक्रे, अंजली टाकळीकर, बाबासाहेब रायकर, प्रा.भाऊसाहेब सांगळे, डॉ.शुभदा लोंढे, डॉ.प्रज्ञा भरड, डॉ.प्रतिमा कदम, डॉ.अर्चना चव्हाण, प्रा.रीमा बत्रा, प्रा.सुषमा चत्तर, सौ. रत्नप्रभा नाईक, प्रा. सीमा ठोंगिरे, डॉ. गणेश खैरे, या मान्यवरांचे विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या संयोजनात, नंदकुमार मुरडे, प्रा.स्वप्ना हजारे (प्रमुख,महिला मंच,महात्मा फुले महाविद्यालय,पिंपरी, पुणे प्रो.(डॉ.) सुहास निंबाळकर, प्रो.(डॉ.)संगीता अहिवळे, डॉ.नीलकंठ डहाळे यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन -डॉ.रुपाली पोखरकर व प्रा.सुप्रिया पाटील यांनी केले. आभार प्रा.अनुप्रिया प्रभू यांनी मानले.
वार्तांकन
सविता इंगळे
9822018281
