You are currently viewing महिला दिनानिमित्त सिंधुदुर्गात अंध बांधवांसाठी एलईडी बल्ब मार्गदर्शन व प्रशिक्षण

महिला दिनानिमित्त सिंधुदुर्गात अंध बांधवांसाठी एलईडी बल्ब मार्गदर्शन व प्रशिक्षण

महिला दिनानिमित्त सिंधुदुर्गात अंध बांधवांसाठी एलईडी बल्ब मार्गदर्शन व प्रशिक्षण

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून अंध बांधवांसाठी एलईडी बल्ब संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडला.
या कार्यक्रमासाठी गडहिंगलज (जि. कोल्हापूर) येथून अवधूत पाटील व त्यांचे सहकारी पवार सर उपस्थित राहून एलईडी बल्ब निर्मिती व दुरुस्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भविष्यात असे प्रशिक्षण केंद्र सुरू करून दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच उपस्थित अंध बांधवांच्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमाला साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसालचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे, उपाध्यक्ष शामसुंदर लोट, सहसचिव सुनिल तांबे, संस्था कर्मचारी प्रसन्ना शिर्के व कु. विशाखा कासले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाला ३० हून अधिक दिव्यांग बंधू-भगिनींनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमानंतर साईकृपा संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्था कर्मचारी कु. विशाखा कासले यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा