*घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरी केली रंगपंचमी*
*बांदा*
सावंतवाडी तालुक्यातील घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा केला. रंगपंचमीच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि रंगांची उधळण पाहायला मिळाली.
या वेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. रंगांच्या माध्यमातून मैत्री, बंधुभाव आणि आनंदाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी सणाचा मनमुराद आनंद घेतला. शाळेच्या परिसरात “रंगपंचमीच्या शुभेच्छा” अशा घोषणांनी वातावरण आनंदमय झाले.
कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रंगपंचमीचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले. सण साजरा करताना पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा आणि सण सुरक्षितपणे व आनंदाने साजरा करावा, असा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेतील मुख्याध्यापक जे.डी.पाटील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्षा यशोदा गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर संचिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
