You are currently viewing बाई पण भारी देवा

बाई पण भारी देवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाई पण भारी देवा* 

 

आज पाऊस पडेल

तुझ्या स्त्रीत्वावर

शुभेच्छांचा

गातील स्तुती सुमने

तुझ्या बाईपणावर

उधळतील पुष्पे

कदाचित

पुष्पमाला ही घालतील

तुझ्या गळ्यात

प्रशंसेच्या शब्दांनी

गरजतीलही

नारी शक्तीचा उदोउदो

करतीलच

यदाकदाचित

बक्षीसांची खैरात वाटतील

फक्त

आजच्या दिवसाला

आज तुझा दिवस

ठरवून घेतलाय

सन्मानासाठी

फक्त एक दिवस

 

तीनशे चौसष्ट दिवस

आहेत की

तुला अपमानास्पद

वागणूक द्यायला

पुरुष प्रधान संस्कृतीत

तू जन्म घेऊन

बाई पण भारी देवा

नुसते म्हणायला…

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा