You are currently viewing सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदासाठी सुस्मिता जाधव यांचे नामनिर्देशन सादर

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदासाठी सुस्मिता जाधव यांचे नामनिर्देशन सादर

सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदासाठी सुस्मिता जाधव यांचे नामनिर्देशन सादर

सावंतवाडी :

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या तळवडे पंचायत समिती सदस्या सुस्मिता सुधाकर जाधव यांनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र सादर केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, शिवसेना गटनेते शरद धाऊसकर, भाजप गटनेते महेश धुरी यांच्यासह शिवसेनेचे सर्व पंचायत समिती सदस्य तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा