पालकमंत्री नितेश राणे यांचे एक पत्र आणि २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर
-अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी
-कणकवली , देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश
-पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले होते पत्र
कणकवली :
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी दिली आहे. कणकवली , देवगड,आणि वैभववाडी तालुक्यातील ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
१) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कणकवलीपासून आणि शिवाजीनगरपासून फोंडा, पर्यंतचा रस्ता रा.मा. १२८ कि.मी. ४५.००० ते ६२.४५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख
२) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील रा.मा.६६ खारेपाटण पासून तिवरेपर्यंत चा रा.मा.१२७ रस्त्यामध्ये कि.मी. ४.४०० ते ४.७००, ९.०० ते ९.०००, १२.०५० ते १२.६००, १२.९५० ते १३.२००, ३४.२०० ते ३४.९०० ची सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख
३) SH १२८ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील फोंडा, उंबरे पर्यंत रस्ता रा.मा.१२८ कि.मी. ६१.४०० ते ७१.०५०, ७४.६०० ते ७५.१००, ८२.२०० ते ८२.३००, ८७.२०० ते ८८.००० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे — २ कोटी ५० लाख
४) MDR २५ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिवल शिवडाव दरिस्ते प्र.जि.मा.-२५ कि.मी. ३/४०० येथे लहान पुलाचे बांधकाम करणे — १ कोटी
५) MDR १ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील संभाजीनगर पासून, वेगणी पर्यंत रस्ता प्र.जि.मा.१ कि.मी. ६/४०० ते ७/८०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – कणकवली) — २ कोटी
६) MDR ५ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबाळे हद्द पासून, केंकवण प्र.जि.मा.५ पर्यंत च्या कि.मी. ३/००० ते ७/००० रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी
७) MDR ७ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील आचिर्णे पासून, कळंब इमसट पर्यंतचा रस्ता प्र.जि.मा.७ कि.मी. ०/००० ते ४/२००, कि.मी. ७/००० ते ८/३५० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – कणकवली) — २ कोटी ५० लाख
८) MDR २४ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सिरीये पासून, प्र.जि.मा.-२४ पर्यंत कि.मी. २५/६०० ते ४३/२०० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १कोटी ६०.लाख
९) MDR १६– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आरे पाटणसाळ, प्र.जि.मा.-१६ पर्यंत कि.मी. ७/००० ते १२/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख
१०) MDR ११ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सांडवे प्र.जि.मा.-११ कि.मी. ०/००० ते ६/६५० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख
११) MDR २० – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील हुंबर सावडाव ओवट रस्ता प्र.जि.मा.२० वरील कि.मी. ०/००० ते ६/६५० मध्ये रस्ता सुधारणा करणे — १ कोटी ५० लाख
१२) MDR ९ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रा.मा.-२७७ पर्यंत प्र.जि.मा.९ रस्त्याचे कि.मी. ६/००० ते ९/२००, १८/००० ते २९/००० सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी ५० लक्ष
१३) MDR ९– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील सांडवे पासून प्र.जि.मा.९ कि.मी. २१/२०० ते २०/३०० व कि.मी. ३६/००० ते ४३/०७० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — २ कोटी
१४) MDR २२– सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नांदगाव पासून, राहाटीपर्यंत प्र.जि.मा.-२२ कि.मी. ८/५०० ते २७/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १ कोटी ६० लाख
१५) MDR २३ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील लिंगडाळ प्र.जि.मा.-२३ कि.मी. ०/००० ते ७/००० मध्ये रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरण करणे (तालुका – देवगड) — १कोटी ६० लाख
या कामांचा समावेश आहे. की कामे २५ कोटीची आहेत.
