You are currently viewing फोंडाघाट एसटी स्टँडवर स्वच्छता अभियान; जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

फोंडाघाट एसटी स्टँडवर स्वच्छता अभियान; जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

फोंडाघाट एसटी स्टँडवर स्वच्छता अभियान; जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

फोंडाघाट

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फोंडाघाट एसटी स्टँड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात सरपंच सौ. संजना आग्रे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच स्थानिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला.
या स्वच्छता मोहिमेत पुढारीचे संपादक जेठे, वर्षा चोरगे, हळदीवे मॅडम, जामदार वायरमन तसेच नायब तहसीलदार दिलीप पाटील यांची उपस्थिती होती. सर्वांनी मिळून एसटी स्टँड परिसराची स्वच्छता करत परिसर चकाचक केला.
या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत अजित नाडकर्णी यांनी सहभागी सर्वांचे अभिनंदन केले. समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा