You are currently viewing नारी एक शक्ती

नारी एक शक्ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवणच्या सन्मा सदस्या सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नारी एक शक्ती*

 

संस्कार देऊनी उत्तम

घडविला तिने शिवाजी

चालवुनी रणांगणी तलवार

उलटविली शत्रुवर बाजी

 

झेलुनी वार अपमानाचे

दिला सावित्रीने शिक्षामंत्र

ईश्वर भक्तीतुनी जनाईने

शिकविले जगण्याचे तंत्र

 

लक्ष्मीच्या पावलांनी

ओलांडिते माप सासरचे

बांधिते सेतू नात्यांचा

राखिते नाव माहेरचे

 

सोसुनी कळा प्रसवाच्या

देते जन्म तान्ह्या बाळास

शूर हिरकणी जननी ती

सांभाळिते लेकरास

 

वासनाधीन हिंसक नजरेने

नका तोडू लचके स्त्रीदेहाचे

महिषासूर मर्दिनी चंडिका

घेईल घोट नराधमांच्या रक्ताचे

 

विरांगणा ती रणरागिणी

करू तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान

स्त्रीशक्तीचा करूनी जागर

वाढवू तिच्या अस्तित्त्वाची शान

 

तिच्या कर्तृत्त्वाचे पोवाडे

नका गाऊ फक्त महिलादिनी

दिव्यज्योत ती निरंतर तेवणारी

बंदीनी दामिनी गृहस्वामिनी

 

*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा