*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ती आहे म्हणून*
ती आहे म्हणून….
घराची आहे दिप्ती
उजळते प्रेरक पणती
आभा सुंदर भोवती
ती आहे म्हणून…..
रक्षण कुळाचे करते
संस्कारांनी मुलांना घडवते
सकारात्मकतेचे धडे देते
ती आहे म्हणून….
जेष्ठांची काळजी घेते
आप्तांची मने सांभाळते
सामोपचाराने वाद मिटवते
ती आहे म्हणून…..
कुळाचार आणि सणवार
लेकीबाळींना माहेरी आधार
उंबरठ्याचे जपते आचार
ती आहे म्हणून…..
पती मित्र सहचर
साथ देते निरंतर
सावली सुखदु:खात खरोखर
ती आहे म्हणून…..
सागरात जसे सरिता
विलीन होते समर्पिता
संसाराची पवित्र गीता
ती आहे म्हणून…
भान असावे जगाला
सन्मान गौरव द्यावा तिला
निरपेक्ष घडवते समाजाला
ती आहे म्हणून….!!
००००००००००००००००
*अरुणा दुद्दलवार✍️*
