महापुरुष मित्र मंडळ कणकवलीतर्फे सुरेश सावंत यांचा सत्कार
माजी सभापती म्हणून कार्याचा गौरव; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
कणकवली :
महापुरुष मित्र मंडळ, कणकवली यांच्या वतीने कणकवलीचे माजी सभापती सुरेश सावंत यांचा सत्कार करण्यात आला. समाजकारण व सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सुरेश सावंत यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक व विकासात्मक कामांमधील त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
