You are currently viewing अनंताचे सांत्वन

अनंताचे सांत्वन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोमसाप मालवणच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनंताचे सांत्वन*

 

चराचराच्या विश्वनिर्मात्या

वंदिते तुजं मी मनापासुनी

नको होऊ तू दुःखी कष्टी

आर्त विनवणी अंतरातुनी

करण्या जगाचा उध्दार

दिला जन्म तू मानवाला

तल्लख बुद्धीच्या वरदानाने

केलेस समृद्ध या पामराला

लालसेने मतिभ्रष्ट झालेल्या

तुझ्या लाडक्या लेकराने

भक्तीचा मुखवटा धारण करत

तुलाच फसवले चातुर्याने

स्वतःच्या विनाशाचा खड्डा

माणूस स्वतःच खणतोय

देहबुद्धीची दुर्दशा पाहून

तुझा जीव मात्र तुटतोय

मोक्षाचा मार्ग दाखविण्या

धाव घेतलीस तू भूतलावर

तुझ्या उदात्त विचारांची मात्रा

उपचार करेल का अष्टविकारावर

 

*✒️© आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा