You are currently viewing सिंधुदुर्गचे सुपुत्र विनोद तावडे राज्यसभेकडे

सिंधुदुर्गचे सुपुत्र विनोद तावडे राज्यसभेकडे

सिंधुदुर्गचे सुपुत्र विनोद तावडे राज्यसभेकडे; बिनविरोध खासदार होण्याचा मार्ग मोकळा

मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन अभिनंदन; उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि भाजपा राष्ट्रीय महामंत्री मान. विनोदजी तावडे यांनी राज्यसभा सदस्यत्वासाठी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातील एकूण सात जागांसाठी सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व उमेदवारांचा बिनविरोध राज्यसभेवर निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई येथे भाजपा पदाधिकारी मंडळींनी तावडे साहेबांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उज्ज्वल राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
विनोद तावडे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या राज्यसभा प्रवेशामुळे महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 👍

प्रतिक्रिया व्यक्त करा