गणेशवाडी : महान कार्य वृत्तसेवा शेडशाळ (ता.शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कवी आपल्या भेटीला हा उपक्रम मराठी राजभाषा गौरव दिन सप्ताह अंतर्गत घेण्यात आला. यावेळी इचलकरंजी येथील प्रसिद्ध कवी दस्तगीर हुसेन नदाफ यांचा कार्यक्रम घेण्यात आला.
सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांच्या हस्ते कवी दस्तगीर नदाफ यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. कवी नदाफ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना आई-वडील व गुरुजनांचा आदर राखला पाहिजे. तसेच आपल्या देशाबद्दल व पर्यावरणाबद्दल मनामध्ये अभिमान कायम ठेवून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी कवितांचे गायन करुन विद्यार्थ्यांची दाद मिळवली.यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक रियाज जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यजित पाटील यांनी केले.
