You are currently viewing कुडाळ पं. स. भाजप गटनेतेपदी अमित भोगले यांची अधिकृत निवड
Oplus_16908288

कुडाळ पं. स. भाजप गटनेतेपदी अमित भोगले यांची अधिकृत निवड

कुडाळ :

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कुडाळ पंचायत समितीमधील भारतीय जनता पार्टी सदस्य गटाच्या गटनेतेपदी श्री. अमित मनोहर भोगले यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कुडाळ भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अमित भोगले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या गटाने निवडीबाबतचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले असून या सदस्य गटात एकूण ७ सदस्यांचा समावेश आहे. या गटाचे नेतृत्व अमित भोगले करणार असून गटातील सदस्यांची नावे व त्यांचे गण पुढीलप्रमाणे आहेत –

१) श्री. अमित मनोहर भोगले (गटनेता) – ५३ ओरोस बुद्रुक

२) श्रीम. श्रावणी धनश्याम तेरसे – ५१ आवळेगाव

३) श्री. नितीन मधुकर महाडेश्वर – ४९ आंब्रड

४) श्रीम. करूणा चंद्रकांत पावसकर – ५६ पावशी

५) श्री. मंगेश श्रीकृष्ण प्रभू – ६० तेंडोली

६) श्रीम. अर्चना अनिल धावणळकर – ६३ घावणळे

७) श्री. सीताराम श्रीधर तेली – ६६ झाराप

सदर गटाची स्थापना व गटनेत्यांची निवड ही महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ मधील नियम ३(१)(अ) व ३(१)(ब) नुसार करण्यात आली आहे.

अमित भोगले यांच्या निवडीमुळे पंचायत समितीमधील भाजपची ताकद अधिक संघटित होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. ओरोस बुद्रुक येथील रहिवासी असलेले अमित भोगले हे आक्रमक व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. आता गटनेते म्हणून त्यांच्या खांद्यावर पक्षाची आणि सदस्य गटाची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा