*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अजुन बंधनात मी!*
अजुन बंधनात मी,नसे कधी रिकामी
जोपासायला मिळतो न वेगळा छंद,
रगाड्यात या संपून जाई, न उरे त्राण
कंटाळवाण्याकाामात मानावाआनंद.
उठल्यापासून ओढा रहाटगाडगे
हाता तोंडाची गाठ कधीतरी पडे,
वेळीअवेळी फापटपसारा आवरा
गतअशी, रोज मरे त्याला कोण रडे.
जोपासावी कसली कलेची आवड
विचार आला कधी जर मनात तर,
नोकरी, नि घरकाम यात कुठे सवड
रात्रंदिवस मरमर,तरी कुणाला कदर.
मुलींचे जीवन आधी कितीअसतेसुंदर
स्वप्नांचे फुलपाखरू, नि मनीचा मोर,
आवडती कला, ध्यास घ्यावा निरंतर
तुरुंगासारखे आयुष्य ते विवाहानंतर
सर्वांचीच होत नसतात स्वप्ने साकार
मुरड घालून मनाला करावा तो संसार
दिवसभर दमून ,महत्वाकांक्षेचा चुरा
झोकून देतस्वतः ला उचलते तो भार.
ज्यांना मायेचे सासर पती गुणवान
सौभाग्यशाली त्या स्त्रिया नशीबवान
सर्व सामान्य गृहिणींचीहीअसे व्यथा
एकेकीचीअसते अशीच दु:खी कथा
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कला शिक्षिका
