जागतिक महिला दिन सप्ताहा निमित्त
मातीतून आयएएस शिखरावर भाग्यश्री बानायत यांची यशोगाथा
@एक आकस्मिक भेट : एक अविस्मरणीय सुरुवात
आयएएस अधिकारी श्रीमती श्रीमती बाणायत यांची माझी पहिली भेट आजपासून २४ वर्षांपूर्वी म्हणजे १० ऑगस्ट २००२ रोजी झाली. अमरावती मधील विद्यापीठ रोडवरील महापौरांच्या बंगल्यासमोरच्या जिजाऊ नगर मधील माझ्या निवासस्थानी ही भेट झाली. त्यावेळी भाग्यश्री एक सामान्य पण डोळ्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न घेऊन वावरणारी विद्यार्थिनी होती. पार्श्वभूमी अशी की विदर्भातील मुलांनी प्रशासनात जावेत म्हणून आम्ही एक १२ मे २००० रोजी अमरावतीला डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमीची स्थापना केली. या उद्घाटनाला महाराष्ट्राचे सध्याचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे हे आले होते .तसेच प्रमुख वक्ते म्हणून सध्या पुण्याला आयकर आयुक्त असलेले श्री अभिनय कुंभार हे उपस्थित होते. पुढे २००२ मध्ये मुलांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय सुरू केले. त्याचे उद्घाटन सध्याचे संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या हस्ते तर माजी जिल्हाधिकारी श्री सदानंद कोचे यांच्या उपस्थितीत पार पाडले.
उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी पहिलीच विद्यार्थिनी म्हणून दाखल झाली ती भाग्यश्री बानायत.ती म्हणाली मी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे राहते. सध्या कॉलेजला शिकते .माझी आई खूप आजारी असते. मी अमरावतीला तुमच्या बाजूलाच असलेल्या अप्रतिम कॉलनीमध्ये राहते .तेव्हाच मला जाणवले ही मुलगी आगळीवेगळी आहे .हिला चांगले भावितव्य आहे.
@वडिलांची दूरदृष्टी स्वप्नांची रुजवात
तिचे वडील शिक्षक होते. पुढे मुख्याध्यापक झाले. पण आईचे आजारपण हे घरात सतत सुरू होतं. वडिलांनी एक अफाट कामगिरी केली. त्यांनी भाग्यश्रीला फक्त शिक्षण दिले नाही. तर तिच्या मनात स्पर्धा परीक्षेची बीजे पेरली. शाळेत असल्यापासून तिला वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग होण्यासाठी प्रवृत्त केले. तिच्यातील आत्मविश्वासाची पायाभरणी करून वडिलांनी हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढविला.
एके दिवशी वडिलांना एक माजी विद्यार्थी जो तोपर्यंत पोलीस ठाणेदार झाला होता. वडिलांना भेटायला आलाहोता. त्याने वडिलांना जोरदार शल्यूट करीत अभिवादन केले आणि म्हणाला सर मी तुमच्यामुळेच घडलो. हा प्रसंग भाग्यश्रीच्या मनात कोरला गेला. ही कृतज्ञता हे यश तिच्या स्वप्नांचा ठिपका बनवून तिच्या डोळ्यासमोर नाचू लागलं. या एका प्रसंगाने तिच्या आयुष्याची दिशा ठरविली.
*एकटीची झुंज : सर्वत्र अडथळे
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी सारख्या छोट्याशा तालुक्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजे नदीच्या प्रवाहात विरुद्ध दिशेने वाटचाल करण्यासारखं होतं. पुस्तकं नव्हती. मार्गदर्शन नव्हतं. वातावरण प्रतिकूल होतं. पण भाग्यश्रीने एक ठरविलं होतं.
श्रुंखला पायीच असू दे
मी गतीचे गीत गाईन
दुःख झेलण्यास
आता आसवांना वेळ नाही
या भावनेने ती झुंज देत राहिली. आईची सेवा करीत राहिली. अभ्यास करीत राहिली. नियतीने मात्र एका बाजूने तिला कठीण परीक्षांना समोर जाण्यास भाग पाडलं.
वडिलांचं अचानक निधन झालं. आईचा आजारपण अधिक गंभीर झालं आणि नातेवाईकांनी
घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी
या ओळी सत्य ठरविल्या. मदतीच्या जागी वाटणीचे हिशोब मांडण्यास सुरुवात केली. तिने हार मानली नाही. भाग्यश्री ठाम होती .ती तिच्या परीने झुंज देत राहिली. आईची सेवा करीत राहिली अभ्यास करीत राहिली. पण नियतीने मात्र तिला एकामागून एक कठीण परीक्षांना समोर जाण्यास भाग पाडलं.
भाग्यश्रीला पहिली नोकरी मिळाली ती अमरावतीला. विषय तज्ञ म्हणून. अमरावती ते मोर्शी ५५ किलोमीटर अंतर. रोज ११० किलोमीटर जाणे येणे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे तिने एक व्रत म्हणून स्वीकारले. या व्रताची फळ येऊ लागली. महाराष्ट्र राजपत्रीत अधिकाऱ्यांची परीक्षा तिने दिली. आणि पहा कोणतेही मार्गदर्शन नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत नोकरी करीत असताना तिने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी प्रभागातून पहिला क्रमांक पटकावला.
जितनेवाले कोई अलग काम नही करते
वह हर काम अलग ढंग से करते है
हे तिने सिद्ध केले.
स्वप्न पुन्हा जागे झाली. राजपत्रित अधिकारी झाल्यानंतर तिच्या सभोवतालचे वातावरण बदललं. ती नागपूरला विक्रीकर सहायक आयुक्त म्हणून रुजू झाली. तिथे तिच्या सहकाऱ्यांनी तिला विचारलं. भाग्यश्री मॅडम तुम्ही एमपीएससीमध्ये महाराष्ट्रात पहिले येऊ शकता तर यूपीएससीची तयारी का करीत नाही ? महत्त्वाकांशी असलेल्या भाग्यश्रीला ते पटलं. आणि तिने सेवेत असतानाच आयएएएसची तयारी सुरू केली. या वेळा तिच्या मदतीला धावून आले ते तिचे सहकारी आणि मार्गदर्शक श्री संजय धिवरे .त्यांनी तिच्यासाठी पुस्तक नोट्स जमविल्या. मुलाखतीची तयार करून दिली. तिचा कायापालट झाला. नोकरीमुळे पुणे मुंबई दिल्लीला जाणे शक्य नव्हतं. आईचे आजारपण एकटेपण सगळं होतं. पण तिला थांबायचं नव्हतं. तिने पहिली परीक्षा व दुसरी परीक्षा पास केली.मुलाखतीच्या सरावासाठी दिल्लीला जाणं आवश्यक होतं. पण ते शक्य नव्हतं. तरी संजय धिवरे यांनी नागपूरला तिची मुलाखतीची तयारी करून घेतली. यश आता अगदी जवळ होतं. आता तिला विश्वास होता.
*निकष मोडणारी मुलाखत
दिल्लीत यूपीएससीच्या मुलाखतीसाठी ती गेली. समोरचे पॅनल कडक होतं. कमी मार्क देण्यासाठी प्रसिद्ध होतं. पण भाग्यश्री निर्णयक होती. तिने प्रामाणिकपणे न घाबरता मुलाखत दिली. प्रश्नांची उत्तरे दिली आणि एक पाऊल पुढे जाऊन येणे इंटरव्यू घेणाऱ्या पॅनल सदस्यांना प्रतिप्रश्नही केले. ते अतिशय अपारंपरिक होतं. धाडसाचे होते. एका सदस्याने विचारले. सनदी झअधिकारी झाल्यानंतर तुम्ही कोणता प्रश्न हाताळणार. भाग्यश्री म्हणाली. सर्वप्रथम मी शेतकऱ्यांचा प्रश्न मी सोडविण्याचा प्रयत्न करणार. मुलाखत घेणारी एक सदस्य म्हणाली. अनेक प्रश्न आहेत. शेतकरीच का ? भाग्यश्रीचे उत्तर होतं. शेतकरी आज जगाचा अन्नदाता आहे. आमच्या विदर्भात शेतकरी आत्महत्याचं प्रमाण खूप जास्त आहे. या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे हे माझं पहिलं कर्तव्य असेल. मुलाखतीनंतर बाहेर पडताना तिला यशाची फारशी अपेक्षा नव्हती. तिने प्रतिप्रश्न करून नियम मोडले होते. पण तिची भूमिका सत्याची व न्यायाची होती.यूपीएससीचा निकाल लागला आणि आमची भाग्यश्री बाणायत आय.ए.एस.अधिकारी झाली होती.
*एक ज्योत लाखो प्रेरणा
आज भाग्यश्री हिच्या व्याख्यानांमुळे तिच्या यशोगाथे मुळे ती सर्वत्र चर्चेत आहे. तिची कहानी प्रत्येक मुलासाठी मुलीसाठी आशेची किरण आहे. आजच्या काळात स्पर्धा परीक्षेचे वातावरण सगळीकडे पसरलंय. पण संसाधन मिळणे जेव्हा कठीण होते. अशा काळात तिने तेव्हा तयारी केली. अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. आजही ती एवढी मोठी अधिकारी असूनही तिला आपण भेटला तर वाटेल की आपण एका मैत्रिणीला मोठ्या बहिणीला भेटतो आहोत. अलीकडे अमरावतीच्या सृष्टी देशमुख हिचा यूपीएससीमध्ये संपूर्ण देशात पहिला क्रमांक पटकाविला. तिचा सत्कार आम्ही केला. भाग्यश्री मॅडमला निमंत्रित केलं. तिचे बाळ लहान होतं. पण तिने नकार दिला नाही. ती आली. तिने मार्गदर्शन केले. तिच्या बोलणे ऐकायला सभागृहात जागा नव्हती. मी जेव्हा तिला कार्यक्रमासाठी फोन करतो. कार्यक्रम मोठा असो का छोटा ती येतेच. नव्या पिढीला मार्गदर्शन करते. दिशा दाखविते.
शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक महापालिका अपर आयुक्त असो की रेशीम संचालनालयाच्या संचालक असो तिने प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. आज जागतिक महिला दिनाचा सप्ताह सुरू आहे. अशा या प्रेरणादायी महिलेला या भाग्यश्रीला माझा मानाचा मुजरा. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन तिने यश संपादन केलेले आहे. ते नक्कीच नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस अमरावती 9890967003
प्रारूप. प्रा. अविनाश शिरसाठ अहिल्यानगर
