You are currently viewing इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘हेमा – रेखा’ गीतांनी श्रोत्यांना सुरेल काळाची अनुभूती

इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘हेमा – रेखा’ गीतांनी श्रोत्यांना सुरेल काळाची अनुभूती

*इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘हेमा – रेखा’ गीतांनी श्रोत्यांना सुरेल काळाची अनुभूती*

पिंपरी

हेमामालिनी आणि रेखा या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींनी दीर्घकाळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अर्थातच त्यात अविस्मरणीय अन् अवीट गोडीच्या गीतांचा सिंहाचा वाटा आहे. इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल!’ या नि:शुल्क ४८ व्या सांगीतिक मैफलीत ‘हेमा – रेखा स्पेशल’ गीतांनी गुरुवार, दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील रसिक श्रोत्यांना त्या सुरेल काळाची अनुभूती दिली. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या निर्मितीतून साकार झालेल्या या खास सांगीतिक मैफलीत पिंपरी – चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवोदित आणि हौशी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे या मूलभूत उद्दिष्टाचे पालन करीत इंडियन म्युझिकल क्लब अर्थातच आय. एम. सी. ने या मैफलीत मनीषा जोशी, सोनल वाणी, लीना जोशी, ज्योती तेरवाडकर, डाॅ. वैशाली सोनवणे, अंजली कुलकर्णी, अर्चना फरांदे, राखी झोपे, प्रमोद शर्मा, निवृत्ती महाजन, गणेश ओव्हाळ, शामकुमार माने, आनंद गायकवाड, मंदार कौशिक, संतोष भोईर, राजेश चित्ते, मंगेश उंबराणी आणि शहाजी कांबळे या नवोदित आणि हौशी गायक कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली होती. यापैकी बहुतांश कलाकारांचे वाद्यवृंदासोबत पहिलेच सादरीकरण असूनही त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण गायनाने त्यांनी संधीचे सोने करीत श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

सांगीतिक मैफलीत
‘प्यार दो प्यार लो…’ , ‘तेरे चेहरे में…’ , ‘आप की ऑंखो में…’ , ‘तेरे बिना जिया…’ , ‘जिंदगी जब भी तेरी…’ , ‘हवा के साथ साथ…’ , ‘आज उनसे पहेली मुलाकात…’ , ‘दिल उसे दो…’ , ‘जब तक हैं जाँ…’ , ‘ड्रीमगर्ल…’ , ‘कैसी पहेली जिंदगानी…’ , ‘परबत के पिछे…’ , ‘सुन सुन दीदी…’ , ‘गुम हैं किसी के…’ , ‘खराबी…’ , ‘देखा एक ख्वाब तो…’ , ‘कल की हसीन…’ , ‘लडी हैं…’ , ‘के आजा तेरी याद…’ , ‘रंग बरसे…’ , ‘मार गयी मुझे…’ , ‘दिलबर मेरे…’ , ‘क्या खूब लगती हो…’ , ‘ओ मेरे राजा…’ , ‘सलाम – ए – इश्क…’ अशा एकाहून एक श्रवणीय गीतांच्या या रंगतदार मैफलीचा समारोप ‘परदेसीयाँ ये सच हैं पिया…’ या लोकप्रिय गीताने करण्यात आला. राशिद शेख आणि नितीन पवार (की बोर्ड), कुशल कामपेल्ली (गिटार), रोहित साने (ऑक्टोपॅड आणि रिदम मशीन), सिद्धार्थ थत्ते (तबला आणि ढोलक) यांनी साथसंगत केली. आय एम सीचे संजय वाघचौरे यांनी ध्वनिसंयोजन व छायाचित्रण केले. विक्रम क्रिएशन्सने दृकश्राव्यचित्रण केले. आय एम सीचे दीपक निस्ताने, धनश्री भोळे आणि प्रशांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन आणि रंगमंच व्यवस्था चोखपणे बजावली. मिलिंद बावा यांनी खुसखुशीत शैलीतून मैफलीचे निवेदन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा