You are currently viewing कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पदर महिला प्रतिष्ठानचा पुढाकार; पाककला स्पर्धा, फॅशन शो आणि गुणवंत महिलांचा सन्मान

कणकवली

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पदर महिला प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी दिली.
७ मार्चला पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्र
शनिवार, ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता लक्ष्मी विष्णू हॉल येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महिलांनी पालक आणि कोथिंबीर या घटकांपासून तयार केलेले पदार्थ घरी बनवून आणायचे आहेत. याशिवाय विविध फनी गेम्सही घेण्यात येणार आहेत.
तसेच मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर यांचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.
८ मार्चला रंगणार सांस्कृतिक सोहळा
रविवार, ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अश्विनी फॅशन डिझायनिंग यांच्याकडून फॅशन शो सादर केला जाणार आहे. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, एकपात्री अभिनय आणि ग्रुप डान्स यांसारखे विविध कार्यक्रम रंगणार आहेत.
यावेळी कणकवली शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, उपस्थितांसाठी भरघोस बक्षिसांसह १० लकी ड्रॉ देखील काढण्यात येणार आहेत.
सहभागासाठी आवाहन
पाककला स्पर्धेसाठी दिशा अंधारी (मो. ९४२२९९७६६७) आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रियाली कोदे (मो. ९४२०५२४२०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा आणि महिला दिन उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्षा मेघा गांगण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा