You are currently viewing मडुरा येथे काजू बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग…

मडुरा येथे काजू बागायतीला शॉर्टसर्किटमुळे आग…

वीज वितरणच्या गलथानपणाचा नुकसानग्रस्ताचा आरोप

बांदा

मडुरा हायस्कूलजवळ असलेल्या प्रकाश वालावलकर यांच्या काजू बागायतीजवळ अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. आगीने रौद्ररूप धारण करण्याच्या अगोदरच ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने तात्काळ आग विझविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. सदर आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचा आरोप बागायतदार प्रकाश वालावलकर यांनी केला.
रविवारी दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास प्रकाश वालावलकर यांच्या काजू बागेजवळ शॉर्टसर्किट झाले. जवळच असलेले बागायतदार प्रकाश वालावलकर तसेच अन्य ग्रामस्थांनी आगीने रौद्ररूप धारण करणे अगोदरच आग विझवल्यामुळे लाखो रुपयांचे होणारे बागायतदारांचे नुकसान टळले. आग विझविण्यासाठी प्रकाश वालावलकर, उल्हास वालावलकर, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, विठ्ठल खर्डे आदी शेतकऱ्यांनी मदतीचा हात दिला.
वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे आंबा बागायतदारांना नुकसान सहन करावे लागले असते. याची दखल वीज महावितरण विभागाने घेणे आवश्यक असल्याचे प्रकाश वालावलकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा