ओटवणे येथील निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीचा आधार
सावंतवाडी
आज सायंकाळी सुमारे ८ वाजता ओटवणे येथून आलेल्या प्रमिला राऊळ (वय ६०) या निराधार महिला माजगाव नाला येथे रस्त्यावर बसलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी त्यांची विचारपूस केली.
महिलेने तब्येत बरी नसल्याचे सांगत डॉक्टरांकडे नेण्याची विनंती केली. तत्काळ सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
त्या ओटवणे येथे राहत असल्याचे व काही नातेवाईक असल्याचे सांगत आहेत; मात्र त्यांना इतर माहिती आठवत नाही.
ज्यांना या महिलेची ओळख पटत असेल त्यांनी कृपया सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय किंवा सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.
तिच्यावर उपचार करून पोलिसांच्या मदतीने रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम हे स्वत पोलिसांच्या गाडीतून जाऊन तिला तिच्या घरी सुखरूप सोडलं.
