अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी
सिंधुदुर्गनगरी,
सैन्य भरती कार्यालयामार्फत अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून १ एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज स्वीकृत केले जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर यांनी केले आहे.
अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (८ वी) व अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी नोंदणी सुरू आहे. ही भरती मोहीम महाराष्ट्र राज्यातील सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांसाठी लागू आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शक असून उमेदवारांनी कोणत्याही दलालांच्या किंवा अफवांच्या आहारी जाऊ नये. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा सैन्य भरती कार्यालय, कोल्हापूर (दूरध्वनी : ०२३१-२६०६४१९) येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
