कुडाळ :
कुडाळ तालुक्यात आज सायंकाळी ५.३० वाजता अवकाळी पाऊस कोसळल्याने आंबा काजू बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान डिंगणे आणि गाळेल या परिसरालाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. काजू हंगामाच्या तोंडावरचे बी गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.