You are currently viewing माझे आनंदी मन हे

माझे आनंदी मन हे

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझे आनंदी मन हे*

 

माझे आनंदी मन हे

फुलासम विहारते

भावनांच्या आकाशात

अलवार बहरते

 

छोट्याशा गोष्टींवर मी

रागावणे हे सोडले

माझ्या आनंदी मनात

मी माझे जग पाहिले

 

किती छानच वाटते

आनंद मिळाल्यावर

होतसे मनात जणू

समाधानाचा पाझर

 

आनंद काय असतो

शिकवते माझे मन

सदा आनंदी रहाणे

हे सर्वात मोठे धन

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा