You are currently viewing रायगड विभाग गाबीत समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

रायगड विभाग गाबीत समाजाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

गणपत मणचेकर यांना ‘गाबीत रत्न’ पुरस्काराने गौरविले

नवी मुंबई / प्रतिनिधी:

गाबीत समाज संस्था रायगड विभागातर्फे आयोजित भव्य वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ नुकतेच कामोठे येथील कराडी समाज हॉलमध्ये संपन्न झाले. रायगड जिल्ह्यातील विखुरलेल्या गाबीत बांधवांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याला समाजातील बांधवांनी मोठी उपस्थिती लावून एकजुटीचे दर्शन घडवले.

कार्यक्रमाचे उद्घाटन गाबीत समाजाचे ज्येष्ठ नेते सखाराम मालाडकर आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक दिलीप पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी रायगड विभागातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच मान्यवरांना ‘गाबीत सन्मान’ देऊन गौरविण्यात आले:

श्री. रमाकांत मणचेकर (समाजसेवा, निवृत्त पोलीस अधिकारी)

श्री. सुदर्शन सारंग (ASI क्राईम ब्रँच, सायबर सेक्युरिटी समुपदेशक)

श्री. रविंद्र भाबल (गटप्रवर्तक, विवाहसंस्था)

श्री. महेंद्र पोसम (उद्योजक)

श्री. स्वप्नील कोयंडे (उद्योजक)

यावर्षीपासून संस्थेने रायगड विभागासाठी अत्यंत मानाचा ‘रायगड विभाग गाबीत रत्न’ हा विशेष पुरस्कार सुरू केला असून, समाजसेवा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल श्री. गणपत उर्फ बाळ रघुनाथ मणचेकर यांना या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत सौ. अस्मिता वैभव जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. पूर्वा प्रशांत मोंडकर तर तृतीय क्रमांक सौ. ग्रीष्मा गणेश माळगावकर यांनी मिळवला. लकी ड्रॉ मध्ये सौ. मनस्वी शिरवडकर व सौ. शर्मिला केशव या पैठणीच्या मानकरी ठरल्या. विभागातील लहान मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री. नितीन भाई पाटील, रायगड भाजप जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश कोळी, शिवसेना शहराध्यक्ष सुनील गोवारी, शेकाप कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल, माजी नगरसेवक डॉ. अरूणकुमार भगत, सौ. ऋतुजा तारी, तसेच नगरसेविका सौ. प्रिया गोवारी, सौ. रितीशा गोवारी, सौ. लीना गरड यांनी उपस्थित राहून रायगड विभाग गाबीत समाजाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. बाळ मणचेकर, अध्यक्ष डॉ. श्री. अनिल पराडकर, उपाध्यक्ष श्री. सुनील चौघुले, कार्याध्यक्ष श्री. विनायक बांदकर, सरचिटणीस श्री. अजय मणचेकर, चिटणीस श्री. संदीप धुरत, खजिनदार श्री. गुरुप्रसाद पराडकर आणि सहखजिनदार श्री. सहदेव हिरनाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच सदस्य श्री. रमाकांत मणचेकर, ॲड. श्री. आनंद आडकर, श्री. महेंद्र मणचेकर, श्री. संदीप पराडकर, श्री. दीपक ढोके, श्री. चंद्रकांत येरम, श्री. दीविज मोंडकर, श्री. योगेश्वर उपरकर, श्री. सुनील जुवाटकर, श्री. शशांक सांगवेकर, श्री. अंकुश मोंडकर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. आकांक्षा केळुसकर उपस्थित होते,

ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण आडकर, शंकर पोसम, हृदयनाथ तारी, सौ. वर्षा भाबल यांच्या आशीर्वादाने आणि ‘गाबीत समाज एकत्र – प्रगतीकडे वाटचाल’ या निर्धाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा