*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ उत्साहात साजरा*
वैभववाडी
वैभववाडी येथील
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आणि संशोधन वृत्ती विकसित करणे या उद्देशाने भौतिकशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग, संख्याशास्त्र विभाग व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महान शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.प्रदीप ढेरे यांनी “सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट व डिजिटल फसवणूक प्रतिबंधक उपाय” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार, सुरक्षित पासवर्डचा वापर, OTP गुप्त ठेवण्याचे महत्त्व आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
तसेच डॉ. विजय पैठणे यांनी “वनस्पतीशास्त्रातील १८३२ पासून २०२६ पर्यंत होऊन गेलेले शास्त्रज्ञ यांची ओळख” या विषयावर ऐतिहासिक व शास्त्रीय माहिती दिली. त्यांनी विविध कालखंडातील संशोधकांचे योगदान स्पष्ट करून विद्यार्थ्यांना संशोधनाची प्रेरणा दिली. तसेच “प्रदूषणरोधक वनस्पती ‘बांदा’ याचे संवर्धन” या विषयावर मार्गदर्शन करत पर्यावरण संरक्षणासाठी अशा वनस्पतींचे महत्त्व अधोरेखित केले.
जंगलतोडीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘बांदा’ वनस्पतीची रोपे दत्तक घेऊन त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. वनस्पतीशास्त्र विभागाच्या पुढाकाराने या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्यात येणार असून पर्यावरण संरक्षणासाठी हा एक सकारात्मक उपक्रम ठरणार आहे. तसेच खाजगी जागेमध्ये झाडांची तोड होत असल्यास संबंधित वनस्पती महाविद्यालयाकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व जैवविविधता जपण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात कु.सेजल रासम व आरती तांबे यांनी महान शास्त्रज्ञ C. V. Raman यांच्या जीवनकार्यावर मनोगते व्यक्त केली.
महाविद्यालयाचे अधिक्षक श्री. संजय रावराणे यांनी आपल्या मनोगतात विज्ञान व पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय राखण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. एम. आय. कुंभार यांनी विज्ञाननिष्ठ व पर्यावरणपूरक समाजनिर्मितीची गरज आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञान, संशोधन व सामाजिक जबाबदारी या तिन्ही गोष्टींचा समतोल साधावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स
असोशिएसन प्रमुख
प्रा. सचिन भास्कर यांनी केले तर आभारप्रदर्शन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माणिक चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी भुतल हिने केले.
