*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सामाजिक कार्यकर्त्या, उपक्रमशील आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विज्ञानाचं वरदान*
विज्ञानाचा चमत्कार विलक्षण
विज्ञानाचं ज्ञानघेऊ सारे जण
स्वयंपाक घरात चालतात
विजेवर उपकरण
महिला वर्गाचा स्वयंपाक
होतो भरकन
औद्योगिक क्षेत्रात पोहचले विज्ञान
अफाट वाढले जीवनावश्यक उत्पादन
विज्ञानाने मिळते ज्ञान मनोरंजन
सुजाण होते जनजीवन
विज्ञानाने कधी अंगावर रोमांच उठतात
कधी त्याचे उग्र रुप बघून
अंगावर काटे उभे राहतात
विज्ञानाचे आहेत
दोन रुप
एक सुरुप
एक कुरुप
वयोवृद्ध होतो
नवतरुण
तर घातक संहाराने
मानव होतो हतबल
चेहरा बनतो कुरुप,
अंग बनते विद्रुप
मानव कसा करतो वापर,
वरदान की शाप….!
अनुपमा जाधव
