कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूरतिठा या शाळेने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) या शाळेतील तब्बल २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशामुळे शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा ठसा उमटला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, मार्गदर्शन वर्ग आणि सराव चाचण्या यांच्या माध्यमातून उत्कृष्ट यश संपादन केले.
मार्गदर्शक शिक्षक सौ. पी. एम. राठोड मॅडम, सौ. पी. पी. दाभोलकर मॅडम आणि श्री. आर. झेड. बागुल सर यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इ. ८ वीचे सर्व विषय शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन मान. श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव मान. श्री. नागेंद्र परब साहेब तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या सहकार्यामुळे हे यश शक्य झाले असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
