You are currently viewing शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा हा शेतीप्रधान अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.असे असताना ई पीक पाहणी तील तांत्रिक गोंधळात शेतकऱ्याचा बळी, मनरेगा चे काम आणि कायमचे थांब, भात खरेदीत तुटीच्या नावाखाली शेतकऱ्याची होणारी लुट, वन्य प्राणी सुरक्षित आणि बळीराजा असुरक्षित,सोलर पंप आणि समस्यांचा बंब,गोधन सांभाळण्यासाठी धनाची कमतरता अशी स्थिती शेती आणि शेतकऱ्यांची झाली आहे. याची जाणीव शासन आणि प्रशासनाला करून देण्यासाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आयोजित केला होता. शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता शासन प्रशासन यांनी तातडीने उपाययोजना करावी अन्यथा भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात अजून तीव्र संघर्ष उभारण्याचा संकल्प आजच्या मोर्चात करण्यात आला.
यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या.
1) ई पीक पाहणी ॲप (DCS-Version 4.0) मध्ये असणाऱ्या तांत्रिक त्रुटी व त्याचे होत असलेले दुष्परिणाम यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा.
2) मनरेगा तील प्रलंबित प्रकरणांना त्वरित मंजुरी देण्यात यावी.
3) भात खरेदी केंद्रावर तुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पावतीपेक्षा जास्त भात घेतले जात असल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत याबद्दल दखल घेण्यात यावी.तसेच भात खरेदी केंद्र 1 डिसेंबर पूर्वी सुरू करावे व प्रति गुंठा भात खरेदी मर्यादा वाढवावी.
4) दिलेले सोलार पंप नादुरुस्त असल्याबाबत तक्रारी असून सोलर कंपनी त्याबद्दल दुर्लक्ष करत आहे. त्यावर उपाययोजना करण्यात यावी तसेच उंच झाडे व त्यांची सावली यामुळे सोलार शेती पंप सक्तीचा न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वन फेज व थ्री फेज वीज जोडणी द्यावी. तसेच सोलार पंपाची सबसिडी शेतकऱ्याला देण्यात यावी.
5) अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत शेतीला वन्य प्राण्यांचा होणारा उपद्रव थांबाविण्यासाठी शेतकर्याला शेतीचे प्राण्याप्रण्यांपासून संरक्षण करण्याचा अधिकार व कायदेशीर संरक्षण द्यावे.
6) हवामान बदलामुळे काजू व आंबा या पिकाला होणाऱ्या नुकसानीबाबत पिक विम्यात योग्य प्रकारे समावेश करावा
7)गोसखी /गोसखा यांना देशी गो वंश पालनासाठी प्रोत्साहन निधी मिळण्याबाबत.

या सर्व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे सर्व विभागांना कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
या धडकमोर्चात भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी सावंत,उपाध्यक्ष सूर्यकांत कुंभार, जिल्हा मंत्री अभय भिडे, जिल्हा सहमंत्री मनोहर ठिकार,कोषाध्यक्ष मिलिद पंतवालावलकर, महिला प्रमुख स्वाती पिंगुळकर,कुडाळ तालुका अध्यक्ष जयराम परब, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष युवराज ठाकूर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पांडुरंग हळदणकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य आबा वराडकर,अश्विनीकुमार मांजरेकर, नंदकिशोर राणे,सखाराम नाईक तसेच तालुका व ग्राम समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा