You are currently viewing कणकवलीत संजय गांधी निराधार योजनेच्या ६४ प्रकरणांना मंजुरी

कणकवलीत संजय गांधी निराधार योजनेच्या ६४ प्रकरणांना मंजुरी

कणकवलीत संजय गांधी निराधार योजनेच्या ६४ प्रकरणांना मंजुरी

कणकवली :

तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता संजय गांधी निराधार योजना समितीची सभा पार पडली. या सभेत विविध योजनांतील एकूण ६४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

सभेला समितीचे अध्यक्ष शरद कर्ले, सदस्य सचिव तथा तहसीलदार दीक्षित देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नायब तहसीलदार गंगाराम एम. कोकरे यांच्यासह समिती सदस्य सुजाता हळदीदे, विजय कालसुलकर, भगवान दळवी, गुरुनाथ वर्देकर, गजानन शिंदे तसेच संजय गांधी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

सभेमध्ये संजय गांधी निराधार योजना  अंतर्गत ४२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तसेच Shravan Bal State Pension Scheme अंतर्गत १९ प्रकरणे आणि Indira Gandhi National Old Age Pension Scheme अंतर्गत ३ प्रकरणांना मान्यता देण्यात आली. अशा एकूण ६४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा