You are currently viewing कसाल येथे दहावी परीक्षा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कसाल येथे दहावी परीक्षा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कसाल येथे दहावी परीक्षा केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसाल या दहावीच्या परीक्षा केंद्राला भेट देत सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली.
इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना त्यांनी परीक्षा कक्षांची तपासणी करून विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था, गोपनीयता आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच विद्यार्थ्यांना शांत आणि अनुकूल वातावरण मिळावे, याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दहावीची परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा तसेच आवश्यक देखरेख याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी अशोक चव्हाण आणि ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा