You are currently viewing मराठी भाषा गौरव दिन
Oplus_16908288

मराठी भाषा गौरव दिन

*ज्येष्ठ लेखिका सामाजिक कार्यकर्त्या, उपक्रमशील आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मराठी भाषा गौरव दिन*

 

स्वागताला आज आलं उधाण

 

आता बोलू या मराठीतून

तिचा गोडवा घेऊ जाणून

 

अनेक संत, हुतात्मे, देशभक्त जन

सर्वांनी घेतले , मराठीचे ज्ञान

 

 

दु:खी मना मराठी देई आनंद

तिजमुळे झाले धुंद

दुष्काळात मिळे जसे

भुकेल्यास अन्न

 

 

मराठी असे ,ऐकायास गोड

गुण वर्णाया शब्द पडतील थोडं

 

मराठी असे सुलभ

घेता ज्ञान होई भलं

 

मराठी भाषा जणू , दुधावरची साय

भाषा अनेक जरी, मराठी असे माय

 

 

मराठी भाषा जसा ,खरा होती

भाषा शिकता ,घडे संस्कारांची नाती

 

मराठी भाषा जणू,सद् गुणांची खाण

 

तिचा वाटू द्या अभिमान

 

 

मराठी भाषा आहे गोजिरवाणी

तिचं साहित्य वाचता नयनात पाणी!

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा